अडीच लाख शेतकऱ्यांना नुकसानीचे 57 कोटी वाटप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

जळगाव तालुक्‍यात 8 हजार 234 शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम 6 कोटी 85 लाख 79 हजार बॅंकांकडे उद्या (ता. 28) दिले जाईल. त्यानंतर ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल, अशी माहिती तहसीलदार वैशाली हिंगे यांनी दिली. 

जळगाव :  जिल्ह्यात ऑक्‍टोंबर महिन्यात झालेल्या अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत शासनाकडून आलेली मदत वाटप जिल्ह्यात सुरू झाली आहे. आतापर्यंत 2 लाख 54 हजार 746 शेतकऱ्यांना 57 कोटी 2 लाख 12 हजार 723 रुपयांचे वाटप झाले आहे. बोदवड व भुसावळ तालुक्‍यात 100 टक्के वाटप झाले आहे. तर मुक्ताईनगर, एरंडोल तालुक्‍यात मात्र अद्याप वाटप सुरू झालेली नाही. 

ऑक्‍टोबर महिन्यात जिल्ह्यात अतिपावसाने सुमारे सहा लाख 41 हजार 345 शेतकऱ्यांचे सात लाख चार हजार 843 हेक्‍टरवर नुकसान झाले होते. त्यासाठी 643 कोटी 64 लाख 52 हजार 323 रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे जिल्हा प्रशासनाने पाठविला होता. राज्यपालांनी आलेल्या प्रस्तावाची दखल घेत तातडीने 179 कोटी 98 लाखाचा निधी जिल्हा प्रशासनाला वर्ग केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय किती निधी वाटप करावा हे निश्‍चित केल्यानंतर आज संबंधित तहसीलदारांना संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश देण्यात दिले होते. 
कपाशी, ज्वारी, बाजरी, मका, कांदा, केळी या पिकांचे अतोनात नुकसान झाले. कपाशीला बोंड फुटल्यानंतर पाऊस आल्याने नुकसान झाले. ज्वारीही काळी पडली. मका व अन्य पिके काढून ठेवल्यानंतर अतिवृष्टी झाल्याने त्यावर बुरशी आली होती. 

तालुकानिहाय निधी वाटप असा 
तालुका- वाटप रक्कम 
भुसावळ ः 5 कोटी 12 लाख 56 हजार 
बोदवड ः 5 कोटी 80 लाख 48 हजार 
यावल ः 1 कोटी 11 लाख 88 हजार 
रावेर ः 2 कोटी 34 लाख 97 हजार 
अमळनेर ः 3 कोटी 66 लाख 41 हजार 
चोपडा ः 12 कोटी 40 लाख 89 हजार 
धरणगाव ः 8 कोटी 73 लाख 
पारोळा ः 22 लाख 82 हजार 
चाळीसगाव ः 99 लाख 4 लाख 
जामनेर ः 10 कोटी 
पाचोरा ः 3 कोटी 87 लाख 53 हजार 
भडगाव ः 2 कोटी 63 लाख 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon district farmer 57 carrore nidhi distrbute