Jalgaon Sports
sakal
जळगाव: स्थानिक खेळाडूंना चांगला सराव करता यावा, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू पोहोचतील, या अनुषंगाने क्रीडासंकुल उभारले गेले. आता जिल्हा क्रीडासंकुलावर सर्व खेळांसाठी अत्याधुनिक अशी ऑलिंपिक स्तरावरील मैदाने तयार केली जात आहेत. खानदेशातील पहिला आधुनिक असा ऑलिपिंक दर्जाचा सिंथेटिक ट्रॅकदेखील तयार होत असून, लागणारे लिक्विड परदेशातून आणण्यात आले आहे.