अरे वा... जळगाव जिल्ह्यात 1 लाख 43 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

जळगाव ः महाविकास आघाडी सरकारने आज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजने अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 43 हजार 832 पात्र शेतकऱ्यांच्या नावांची यादी जाहीर केली. ही यादी केवळ जेडीसीसी बॅंकेच्या सभासद कर्जदारांची आहे. अजून काही शेतकरी बाकी आहे. सोबतच राष्ट्रीयकृत बॅंकेच्या शेतकऱ्यांची यादी बाकी आहे. कर्जमाफीच्या रक्कमेचा तपशील उद्या (ता.1) कळणार आहे. 

राज्यात काल (ता. 28) राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेमुळे जळगावसह 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली नव्हती. म्हस्कावद सीम व खुर्द (ता. रावेर) अशा दोन ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. यामुळे काल रात्री उशिरापर्यंत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी 
जाहीर झाली नाही. 
24 फेब्रुवारीस हिंगोणा (ता. यावल) व कराडी (ता. पारोळा) येथील पात्र शेतकऱ्यांचे आधारकार्डासोबत प्रमाणीकरणाचे काम सुरू होते. 205 शेतकऱ्यांपैकी 142 शेतकऱ्यांच्या अकौंटमध्ये कर्जमाफीची रक्कमही जमा करण्यात आली आहे. 
आज निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यात एकूण 1 लाख 43 हजार 832 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. 

प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू 
कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आजपासूनच शेतकऱ्यांचे प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रेशन दुकान, तहसील कार्यालय, आपले सेवा केंद्रात प्रमाणीकरणाची सुविधा असेल. ज्याठिकाणी याद्या जाहीर होतील त्या तेथे प्रमाणीकरण करता येणार आहे. आज सहकार विभागाने प्रशिक्षण घेतलेल्या विभागांना तशा सूचना दिल्या आहेत. 

180 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ 
आतापर्यंत प्रमाणीकरण झालेल्या 180 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 1 कोटी 30 लाख 92 हजारांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 
------ 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon farmaer crop loan mafi