Electric Wire Sparks
sakal
जळगाव: लोंबकळलेल्या वीजतारांनी अंत्ययात्रेत विघ्न आणल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील चौघुले प्लॉट परिसरात घडला. मृतदेह स्मशानभूमीकडे नेण्यासाठी सज्ज असलेली वैकुंठ वाहिनी अंत्ययात्रेच्या पुढे पाच पावले जात असताना अचानक ‘महावितरण’च्या खाली लोंबकळत असलेल्या वीजवाहिनी (बंच केबल)मध्ये अडकली आणि स्पार्किंग होऊन वाहिनीला आग लागली, तसेच गाडीतही प्रवाह उतरला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली, तरी ‘महावितरण’चा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर येत असल्याचे दिसून येत आहे.