जळगाव: शहरासह जिल्ह्यात सर्वत्र बुधवारी (ता.२७) गणरायाचे वाजतगाजत आगमन झाले. स्थपनेपासून ते विसर्जनापर्यंत जिल्हा पोलिस दल अलर्ट मोडवर आले आहे. अडीचशेवर गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर पिटाळून ८०० गुंडांना बॉण्ड देण्यास भाग पाडण्यात आले आहे. गणेशमूर्तींची आज स्थापना झाल्यानंतर पोलिस ठाणेनिहाय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी संपूर्णतः व्यस्त झाले आहेत.