Illegal Sand
sakal
जळगाव: जिल्ह्यात गिरणा नदीपात्रातून अवैध वाळूच्या उत्खननाबाबत ‘सकाळ’ने अनेक वेळा वृत्त दिले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी महसूल पथकांसह धानोरा-मोहाडी शिवारात अचानक छापे टाकून सुमारे तीन ते चार हजार ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे. रात्रंदिवस वाळूचा अवैधरित्या उपसा करण्यासाठी वाळूमाफियांनी वाळू नदीपात्रात झोपड्या तयार करून त्यात भोजनाची सोयही केली होती, हे विशेष.