जळगाव: महाराष्ट्राच्या २५ अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाकांक्षी ध्येयात जळगाव जिल्ह्याला मोठे योगदान देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत सुवर्णकार आणि उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीत जळगावला ‘ग्लोबल गोल्ड हब’ बनविण्याच्या संकल्पनेवर सखोल चर्चा झाली. आयटी पार्कच्या धर्तीवर सोन्याच्या उद्योगासाठी विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) उभारण्याचा प्रस्तावही या वेळी मांडण्यात आला.