Gold Silver Price
sakal
जळगाव: यंदाच्या वर्षात सोने, चांदीच्या भावात लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे. केवळ डिसेंबरचा विचार केल्यास गेल्या २१ दिवसांत सोन्याच्या भावात प्रतिदहा ग्रॅम साडेपाच हजार रुपयांची वाढ झाली, तर चांदीच्या भावात तब्बल २७ हजारांची प्रतिकिलोमागे वाढ झाली आहे. भाववाढीने गुंतवणूकदार हैराण झाले आहेत. आताच एवढे दर, तर आगामी काळात काय भाव असतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.