Gold
sakal
जळगाव: येथील सुवर्ण बाजारात सोने-चांदीच्या भावाचा उच्चांक वाढतच आहे. गेल्या सहा दिवसांत चांदीच्या भावात प्रतिकिलो २१ हजारांची वाढ होऊन चांदीने एक लाख ७० हजारांचा (विनाजीएसटी) टप्पा गाठला; तर सोन्यात चार हजार २०० रुपयांची वाढ होऊन सोने प्रतिदहा ग्रॅमला एक लाख २२ हजार २०० रुपयांवर (विनाजीएसटी) पोहोचले आहे.