Jalgaon traffic
sakal
जळगाव: गुगल मॅपच्या भरवशावर देशभरात अनेक वाहने सुसाट चालत आहेत. मात्र, याच गुगल मॅपमुळे चुकीची वाट धरून मोठ्या अपघातानाही तोंड द्यावे लागत असताना शहरात एक नवीनच प्रकार समोर आला आहे. गुगल मॅपवर चालणारी अवजड कंटेनर शनिपेठ, भिलपुरा कांचननगर रस्त्यावर अडकल्याचे प्रकार घडू लागले आहेत. यात चालकांना मारहाण होत असल्याचे प्रकारही वाढले आहेत. यावर स्थानिक प्रशासनाने दखल घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.