जळगाव- गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या महामार्ग चौपदरीकरणातील जळगाव शहराच्या वळण रस्त्याच्या (बायपास) कामाला अलीकडच्या काळात गती देण्यात आली असली आणि हे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा ‘अल्टिमेटम’ दिला असला, तरी ते या महिन्यात पूर्ण होणे केवळ अशक्य आहे. अद्यापही बायपास रस्त्याचे ४० टक्के काम अपूर्ण असून, आणखी किमान सहा महिने तरी ते पूर्ण होण्यासाठी लागतील, असे मानले जात आहे.