Project
sakal
जळगाव: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या देखभाल- दुरुस्ती दायित्व कालावधीची मुदत मे २०२७ पर्यंत आहे. पर्यायाने मक्तेदार एजन्सीची दुरुस्तीची जबाबदारी संपणार असल्याने महामार्गाच्या देखभालीचा प्रश्न निर्माण होणार आहे. आधीच या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे समोर आले असून, येणाऱ्या दीड वर्षात त्याची गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे. दुर्दैवाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.