HIV/AIDS
sakal
जळगाव: जिल्ह्यातील एड्सबाधितांचे प्रमाण काही वर्षांपूर्वी सहा टक्के होते. ते आता ०.०९ टक्क्यांवर आले आहे; तर एड्सबाधित गरोदर महिलांचे प्रमाण ११४ वरून ९ पर्यंत खाली आले. एकंदरीत युवक, युवती, देहविक्री करणाऱ्या महिला, इतर राज्यांतून येणारा कामगारवर्ग यांच्यात एड्सबाबत झालेल्या जनजागृतीमुळे हे शक्य झाले. एकंदरीत जिल्ह्याची वाटचाल एड्समुक्त जिल्हा अशी होत आहे.