Jalgaon Crime : पत्रकार दीपक कुलकर्णी यांना दबा धरून मारहाण, हल्लेखोरांनी डोक्यात बियरची बाटली फोडली
Journalist Attacked Near Office in Jalgaon : जळगाव शहरातील बळीरामपेठेत वृत्तपत्राचे पत्रकार दीपक कुलकर्णी यांना तिघांनी अडवून मारहाण केली. या मारहाणीत एकाने त्यांच्या डोक्यात बियरची बाटली फोडल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जळगाव: शहरातील एका वृत्तपत्रात कार्यरत पत्रकार रविवारी (ता.२) दुपारी तीनच्या सुमारास कार्यालयात येत असताना बळीरामपेठेत दबा धरून बसलेल्या तीन तरुणांनी त्यांना अडवून मारहाण केली.