जळगाव- तालुक्यातील नशिराबाद येथील के. एस. टी. ऊर्दू माध्यमिक शाळेतील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (लिव्हिंग सर्टिफिकेट) दिला जात नसल्याने ८० विद्यार्थ्यांवर अकरावीच्या प्रवेशाचे संकट ओढवले होते. हा प्रकार समोर आल्यावर विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती.