Ladki Bahin Yojana
sakal
जळगाव: राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही भागात अंगणवाडी सेविकांना घरोघर फिरून पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अंगणवाडी सेविका संघटनेकडून पडताळणीच्या कामाला विरोध केला आहे. यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासन व संघटनेतील तिढा निर्माण होऊन लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’चा प्रश्न मात्र रखडणार आहे.