नाल्यात लपवुन ठेवलेल्या लाखाच्या दारुची तस्करी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 एप्रिल 2020

अंजिंठा चौकातील आर.के.वाईन चालकाच्या मुलालाच तस्करी करतांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाने नंतर वेगळेच वळण घेवुन पोलिसांच्या भागीदारीचे पुरावे आढळून आल्याने पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची खात्यातून हकलपट्टी करण्यात आली होती. याच आर.के.वाईन कडून हॉटेल पांचाली मध्ये पुरवठा करण्यात येत असल्याची बाब समोर आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्टॉकची तपासणी करुन तफावत असल्याचे नोंदवले आहे. 

जळगाव, :- शनिवारी मध्यरात्री इंडिका कारमधून एक लाखाचा विदेशी मद्यसाठा घेवुन जाणाऱ्या कारचा पोलिसांनी पाठलाग केल्याने कारचालकाने वाहन सोडून पळ काढला होता. शनिपेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद होवुन निरीक्षक विठ्ठल ससे यांनी दोन संशयीतांना अटक केली असून त्यापैकी एक प्रभात कॉलनी चौकातील हॉटेल पांचालीचा माजी मॅनेजर असल्याचे तपासात उघड झाले असुन अटकेतील दोघा संशयीतांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अटकेतील दोघा संशयीतांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सापडलेली दारु त्यांनी प्रभात कॉलीच्या नाल्याच्या कापारीतुन आणल्याची माहिती संशयीतांनी दिली आहे. 

"आर. के. वाइन'च्या प्रकरणामुळे पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह तीन पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फच्या कारवाईला सामोरे जावे लागले. राज्यभर गाजत असलेल्या मद्यतस्करीच्या प्रकरणासारखाच प्रकार पुन्हा शनिवार(ता.25) रोजी उघडकीस आला होता. मध्यरात्री गस्तीवर असतांना निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या पथकाला इंडिका कारवर (एमएच 19, एएस 6608) संशय आल्यावर त्यांनी पाठलाग करुन कोंबडी बाजारा जवळील भिलाटीच्या गल्लीत चालकासह एक कार सोडून पसार झाला होता. गुन्ह्याचा छडा लावून निरीक्षक ससे यांच्या पथकातील दिनेशसींग राजपुत, रविंद्र पवार, मुकूंद गंगावणे,हकिम शेख, धनंजय येवले, अश्‍वीन हडपे अशांनी काल संदिप अरविंद पाटिल (वय-26,रा.चंदुअण्णा नगर), हरीष राजेंद्र बारी (वय-25) अशा दोघांना अटक केली.अटकेनंतर संशयीतांची चौकशी केल्यावर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्या.नेमाडे यांच्या न्यायलायाने संशयीतांना 1दिवसांची पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेशीत केले आहे. 

आर.के.वाईन चे पांचाली कनेक्‍शन 
12 एप्रील रोजी अंजिंठा चौकातील आर.के.वाईन चालकाच्या मुलालाच तस्करी करतांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाने नंतर वेगळेच वळण घेवुन पोलिसांच्या भागीदारीचे पुरावे आढळून आल्याने पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची खात्यातून हकलपट्टी करण्यात आली होती. याच आर.के.वाईन कडून हॉटेल पांचाली मध्ये पुरवठा करण्यात येत असल्याची बाब समोर आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्टॉकची तपासणी करुन तफावत असल्याचे नोंदवले आहे. 

नाल्यात लपवली दारु

अटकेतील संदिप अरविंद पाटिल आणि हरीष राजेंद्र बारी या दोघांची चौकशी केल्यावर हरीष बारी हा हॉटेल पांचालीचा मॅनेजर राहुल चुकला असून काही महिन्यापुर्वीच त्याने काम सोडले होते. त्याच्या ताब्यातील कार मध्ये मिळून आलेला लाख रुपयांचा दारु साठा त्याने प्रभात कॉलनी चौकातील एका नाल्याच्या कपारीत लपवुन ठेवला होता, तेथून आणल्याची माहिती तो पोलिसांना देत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon liqur sumaglor arrest