Election
sakal
जळगाव: जिल्ह्यातील १६ पालिका व दोन दोन नगरपंचायतींसाठी मंगळवारी (ता. २) शांततेत व उत्साहात मतदान झाले. सकाळी मतदान केंद्रांवर शुकशुकाट असला, तरी दुपारनंतर मतदार घराबाहेर पडले. अनेक मतदान केंद्रांवर रात्री आठनंतरही रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यात एकूण ६५.५८ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत गेल्या वर्षीच्या विधानसभा (५६.०३) निवडणुकीपेक्षा सुमारे दहा टक्के अधिक मतदान झाले. हे चांगल्या लोकशाहीचे प्रतीक आहे. मात्र, अनेक ठिकाणी उमेदवारांनी मतदारांना ‘लक्ष्मी’ दर्शनाचा लाभ दिल्याची चर्चा जनमाणसांत आहे.