मूजोर डंपर चालकांनीच केला रास्ता रोको...!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

मुजोर डंपर चालकांनी सायंकाळी आकाशवाणी चौकातील मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून पोलिसांशी हुज्जत घातली. 

जळगाव ः पोलिस जिल्हा प्रशासन व शहर वाहतुक शाखेतर्फे शहरातील अवजड व डंपर वाहनांची अचानक गती नियंत्रणकाची तपासणी केली. दोषी अढळलेल्या डंपर पोलिसांनी जप्त केल्याने आज मुजोर डंपर चालकांनी सायंकाळी आकाशवाणी चौकातील मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून पोलिसांशी हुज्जत घातली. 

शहरात सुसाट डंपर वाहनांमुळे गेल्या अनेक दिवसापांसून मोठ्या प्रमाणात होत आहे. यात वाळू वाहणारे, खडी, दगड वाहणारे डंपरची प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या वाहनांवर आळा बसविण्यासाठी गुरूवारी सकाळी जिल्हा पोलिस दल व वाहतुक शाखेने डंपरची गती नियंत्रणकांची तापसणी केली होती. यात बारा दोषी अढळलेल्या डंपर चालकांचे डंपर जमा करून दंड आकारण्यात आला होता. त्यावरून आज डंपर व्यवसायकांनी पोलिसांच्या कारवाईच्या विरोधात आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे 
महामार्गावरील काही वेळासाठी वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी जिल्हा पेठचे पोलिस अधिकारी तसेच शहर वाहतुक शाखेचे पोलिस अधिकाऱ्यांनी येवून डंपर व्यवसायीकांची समजुत काढली. 
 

आर्वजून पहा :महाविकास आघाडीच्या... दोन गुलाबांमध्ये पून्हा उमळले संघर्षाचे काटे ! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news aakshwani chuk rasta roko andolan Dumper businessmen