महाविकास आघाडीच्या... दोन गुलाबांमध्ये पून्हा उमळले संघर्षाचे काटे ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

आपण दोघे या अघाडातील असून सत्तेतील मित्र पक्षांना सोबत घेवून काम करा, त्यांच्यावर उगाच टिका करू नका "महाविकास आघाडीचा धर्म पाळा'ही आपली टिका नव्हे तर समज आहे.

जळगाव : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे... आपण दोघे या अघाडातील असून सत्तेतील मित्र पक्षांना सोबत घेवून काम करा, त्यांच्यावर उगाच टिका करू नका "महाविकास आघाडीचा धर्म पाळा'ही आपली टिका नव्हे तर समज आहे. असा जोरदार टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना आज लगावला. 

धरणगाव येथे शुक्रवारी मंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार कार्यक्रम झाला. त्यावेळी त्यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर विकास कामावरून टिका केली होती. या टिकेला उत्तर देतांना राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांनी आज पत्रकार परिषदेत घेतली. पुढे बोलतांना देवकर म्हणाले, की महाविकास आघाडीमधील सत्तेचे आपण मित्र आहोत. सोबत काम करणे सोडून टिका का करतात. माझ्या काळात रस्त्याचे काम निकृष्ट केले असे टिका त्यांनी केली. परंतू मी केलेले एक तरी रस्ता खराब झाल्याचे त्यांनी दाखवून द्यावे. परंतू गेल्या पाच वर्षात पाटील मंत्री होते. त्या काळात हे काम ते पूर्ण करू शकलेले नाहीत. त्यांनी पाच वर्षात काय केले हे जनतेला सांगावे. त्यांनी आता भोकर नदीवरील पूल करावा, धरणगावची पाणी पुरवठा योजना पूर्ण करावी. त्यांनी विकास कामे करावीत, उगाच टिका करू नये. 

नक्की पहा : शिक्षेत सुट मिळविणाऱ्यांनाच भाजप वीर म्हणतात : योगेंद्र यादव 

तर...नेत्यांकडे तक्रार करणार 
राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्र पक्ष आहे. त्यांना मंत्री बनविण्यात मुख्यमंत्री उध्दव 
ठाकरे यांचा जेवढा वाटा आहे. तेवढाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, कॉंग्रेसच्या नेत्या सोनीया गांधी यांचाही वाटा आहे. त्यांमुळे त्यांनी मित्र पक्षांचे भान ठेवून कार्य करावे. आपण त्यांना ही समज देत आहोत. जर त्यांनी अशी टीका सुरू ठेवली तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे तक्रार करणार आहोत. 

हेपण पहा : शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार द्या 
 

दोघा गुलाबांमध्ये पून्हा संघर्ष ! 
जळगाव ग्रामीण मतदार संघात आधी दोघी गुलाबराव हे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे. त्यांच्या दोघांमध्ये अनेकदा शाब्दीक संघर्ष झाले असून ते आता "महाविकास आघाडीच्या' सत्तेमधील नेत्यांमध्ये संघर्ष सुरू झाल्याची राजकीय वर्तूळात चर्चा रंगू लागली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news menistar gulabrav patil and ncp gulabrav devkar Accusation