लंघुशंकेसाठी थांबला...अन्‌ झाला अनर्थ ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

ट्रक चालकाला लघवी लागल्याने त्याने नशिराबाद गावाजवळ महामार्गाखाली ट्रक उतरवुन थांबवला. रस्त्याच्या कडेला लघुशंका करत असतांना सुसाट वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने ट्रकचालक चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री नशीराबादजवळ घडली. 

जळगाव : भुसावळ कडून नशिराबाद मार्गे बांभोरीकडे मजुर घेवून येणाऱ्या ट्रक चालकाला लघवी लागल्याने त्याने नशिराबाद गावाजवळ महामार्गाखाली ट्रक उतरवुन थांबवला. रस्त्याच्या कडेला लघुशंका करत असतांना सुसाट वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने ट्रकचालक संतोष भावलाल नन्नवरे (वय-30,रा. बांभोरी प्र.चा.) यास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री नशीराबादजवळ घडली. 

नशिराबाद पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, संतोष नन्नवरे हे ट्रकचालकाचे काम करतात. सोमवारी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास नशीराबादकडून बांभोरीकडे ट्रकने मजूरांसह परतत होता. यादरम्यान नशीराबादजवळ लघुशंका करण्यासाठी ट्रक उभा केला. यानंतर महामार्गावर लघुशंका करत असतांना महामार्गाहून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या जोरदार धडकेत संतोष दहाफूट दूरवर फेकला गेला होता. त्यांच्या डोक्‍यांचा गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या मजूरांच्या लक्षात आल्याने त्यांनी नशीराबाद पोलीसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी नशीराबाद पोलीसात अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येवून मंगळवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

आर्वजून पहा ः वय वर्ष 103...कार्य मात्र तरूणांनाही लाजविणारे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news accidant by nashirabad truk drivhar deth