जळगाव अजून चार पॉझेटिव्ह...कोरोना बाधती रुग्ण संख्या 180 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 180 इतकी झाली असून त्यापैकी पंचवीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव :जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या 12 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 8 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून चार व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 
     
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये एक व्यक्ती जळगाव तर तीन व्यक्ती भुसावळच्या आहेत. यामध्ये जळगाव येथील 50 वर्षीय पुरूष, तर भुसावळ येथील तलाठी काॅलनीतील 10 वर्षीय मुलगा, जाम मोहल्ला येथील 48 वर्षीय पुरूष व अयाश काॅलनी येथील 60 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 180 इतकी झाली असून त्यापैकी पंचवीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तेवीस रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news agin fore corona Patient positive