पाडळसरे, शेळगाव बॅरेजसह अन्य प्रकल्प पूर्ण करणार: मुख्यमंत्री 

Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray

जळगाव : शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी मिळावे यासाठी जळगाव जिल्ह्यातील निम्नतापी प्रकल्प (पाडळसरे), पद्मालय सिंचन प्रकल्प, बलून बंधारे शेळगाव बॅरेज, वरखेड लोंढे प्रकल्पाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. 

जळगाव जिल्ह्याची आढावा बैठक गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री 
तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषिमंत्री दादाजी भुसे, आमदार चंदुलाल पटेल, चिमणराव पाटील, किशोर पाटील, सुरेश भोळे, अनिल पाटील, मंगेश चव्हाण, लताताई सोनवणे, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधानसचिव भूषण गगराणी, कृषी सचिव एकनाथ डवले, जलसंपदा सचिव आय. एस. चहल, ऊर्जा सचिव असीमकुमार गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री सगणे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, तापी पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे आदींसह सर्व विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. 

सिंचन प्रकल्पांवर भर 
मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी मिळावे याकरिता राज्यातील अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल. अंजनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना होत असलेला त्रास लक्षात घेता ऊर्जा विभागाने कृषिपंपांना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्याबाबत त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. 

आमदारांकडून या मागण्या 
यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची, अंजनी प्रकल्पाची उंची वाढविण्याची, तापी खोऱ्यातील गुजरातला जाणारे पाणी अडविण्याची, आमदार किशोर पाटील यांनी वन्यजीवांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची, क्रीडा संकुले पूर्ण करण्याची, मंगेश चव्हाण यांनी कत्तलखाना बंद करणे, चाळीसगाव -मालेगाव रस्ता दुरुस्ती, कृषी विभागातील रिक्त पदे भरणे, अनिल पाटील यांनी नदीजोड प्रकल्प राबविणे, अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, दगडी दरवाजा दुरुस्ती, लता सोनवणे यांनी धानोरा येथील सबस्टेशन उभारणी, तापी नदीवर दुसरा पूल बांधणे, जात पडताळणी कार्यालय धुळे येथे सुरू करणे, सुरेश भोळे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत जळगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून घरे उभारणे, जळगाव शहरासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय मंजूर करणे, जळगाव शहरातील विशेष निधीतून होणाऱ्या कामांची स्थगिती उठविणे, तर चंदुलाल पटेल यांनी जळगाव शहरास जोडणाऱ्या बांभोरी पुलास पर्यायी पूल तयार करण्याची मागणी बैठकीत केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com