"रेशन'च्या काळ्याबाजाराकडे डोळेझाक...स्वस्त धान्य दुकानदारांची चलती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

रेशन कार्डधारकांना आहे. मात्र, तीही मिळत नसल्याने रेशनकार्डधारकांमध्ये प्रशासनाविषयी असंतोषाचे वातावरण आहे. याकडे जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी रेशनकार्डधारक करीत आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात रेशन दुकानांतून दुकानदारांचे "थम' घेऊन नागरिकांना धान्य वितरण करण्यात येत आहे. मात्र, यात दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणावर काळाबाजार केला जात असल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. मात्र, जिल्हा प्रशासन, पुरवठा विभागाचे अधिकारी अहवालच करण्यात व्यस्त होते. एकाही रेशन दुकानदारावर जाऊन खरा प्रकार पाहण्याची तसदीही अधिकाऱ्यांनी घेतली नाही. यामुळे रेशन कार्डधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 

रेशन दुकानांमधून "पॉस मशिन'वर "थम' करण्याचे अधिकार दुकानदारांना दिल्याने दुकानदारांचे चांगलेच फावले आहे. रेशनकार्डधारकांच्या नावावर आलेले धान्य आलेच नाही, असे सांगून कार्डावरील सदस्य संख्यापेक्षा कमी संख्येचेच धान्य वितरित होत असल्याच्या अनेक तक्रारी रेशनकार्डधारकांच्या आहेत. "लॉकडाउन'च्या काळात गरिबांना रोजगार नाही. किमान रेशनवरील धान्य मिळेल, अशी आशा रेशन कार्डधारकांना आहे. मात्र, तीही मिळत नसल्याने रेशनकार्डधारकांमध्ये प्रशासनाविषयी असंतोषाचे वातावरण आहे. याकडे जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी रेशनकार्डधारक करीत आहे. 

नक्की वाचा : बांधकाम क्षेत्रासाठी दुष्काळात तेरावा महिना 
 

"डाटा एन्ट्री'ची नावे उडाली 
"सकाळ'ने आज रेशन दुकानदारांकडून होत असलेल्या धान्याच्या काळाबाजाराबाबत वृत्त प्रसिद्ध केले असता, त्यातून पळवाट काढण्यासाठी जिल्हा सरकारमान्य रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना आमच्याकडील अन्न सुरक्षा योजनेची डाटा एन्ट्रीतील नावे उडाली असून, नवीन यादी तयार करून मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष जमनादास भाटिया, उपाध्यक्षा शुभांगी बिऱ्हाडे, सचिव प्रशांत भावसार, कार्याध्यक्ष सुनील जावळे, लियाकत खान, डिगंबर मोरे, गणेश जोगी, बाबू शेख, प्रकाश भंगाळे आदी उपस्थित होते. अनेक रेशनकार्डधारक आमच्याकडे धान्य घेण्यास येतात. मात्र, त्यांची नाव डाटा एन्ट्रीतून उडाली असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. पुरवठा अधिकाऱ्यांनी नावे उडालेल्या नागरिकांची नावे तहसीलदारांकडून मागविली आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news Eyes on the black market of ration ... Cheap grain shopkeepers move