भाजपच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी हरिभाऊ जावळेंची निवड

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 January 2020

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी माजी आमदार हरिभाऊ जावळे यांची आज 
केंद्रीय मंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एकमताने निवड केली. गोंधळानंतर पून्हा सुरू झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. 

भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडीसाठी आज दुपारी 2 वाजता संत बाबा हरदासराम मंगल कार्यालयात सभेला सुरवात झाली. मात्र, सभा सुरु होताच भुसावळ शहरातील कार्यकर्त्यांनी राडा केल्याने सभा काही वेळासाठी बंद झाली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब, माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सभा सुरू झाली. जिल्हाध्यक्षपदासाठी दहा जणांचे अर्ज आले होते. त्यातील नऊ जणांनी अर्ज मागे घेत माजी आमदार हरिभाऊ जावळे यांच्या एकमाताने नावाची घोषणा मंत्री दानवे यांनी सभेत केली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी हरिभाऊंना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news Haribhau Javala elected as BJP's Jalgaon district president