जळगाव महापालिकेचे अंदाजपत्रक 1141 कोटींचे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

करांचा कोणताही बोझा न लादता 1141 कोटी 96 लाख रुपयांचे महापालिकेचे 2020-21 या वर्षाचे अंदाजपत्रक प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे 
यांनी मंगळवारी स्थायी समितीपुढे मांडले.

जळगाव : नागरिकांवर कोणताही करांचा कोणताही बोझा न लादता 1141 कोटी 96 लाख रुपयांचे महापालिकेचे 2020-21 या वर्षाचे अंदाजपत्रक प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे 
यांनी मंगळवारी स्थायी समितीपुढे मांडले. प्रशासनाच्यावतीने सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकावर अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी सभा तहकूब करण्यात आली. 

महापालिकेची मंगळवारी दुपारी तीनला स्थायी समितीची विशेष सभा झाली. अध्यक्षस्थानी सभापती ऍड. शुचिता हाडा, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त अजित मुठे, उपायुक्त मिनीनाथ दंडवते, मुख्य लेखापरीक्षक संतोष वाहुळे, मुख्य लेखाधिकारी कपिल पवार आदी उपस्थित होते. 

आर्वजून पहा : जिल्हाधिकाऱ्यांचा दुसरा दणका... चार ग्रामपंचायतींचे सात सदस्य अपात्र 
 

यावेळी आयुक्तांनी महापालिकेचे 2020 -21 या वर्षाचे जमा-खर्चाचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीपुढे सादर केले. यावेळी आयुक्तांनी आपल्या निवेदनात म्हटले, की कोणतीही करवाढ नसलेले हे अंदाजपत्रक आहे. यात शहरात नागरिकांना सुविधा देणे मोठे आव्हान असून, महापालिकेच्या उत्पन्नावर भर 
देऊन 2019 -20 च्या महापालिकेच्या महसुली उत्पन्नासाठी वसुलीत वाढ करून कमी खर्चात 2020-21 च्या उत्पन्नाचा व खर्चाचा ताळमेळ साधत 1141 कोटी 96 लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. 

बाजार शुल्क 30 वरून 50 रुपये 
महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या करात कोणतीही वाढ केली नसली तरी अंदाजपत्रकात हॉकर्सकडून केल्या जाणाऱ्या दैनंदिन बाजार आकारणी शुल्कात वाढ केली आहे. हे शुल्क पूर्वी वीसवरून 30 रुपये करण्यात आले होते. आता बाजार शुल्कात 50 रुपये वाढ सूचविलेली आहे. 

हेपण पहा : जळगावच्या लिटल पॅडमॅनचे हे सयंत्र महिला आरोग्यासाठी वरदान 
 

168 कोटी शिलकीचे अंदाजपत्रक 
महापालिकेचे 2019- 20 या वर्षातील सुधारित आणि 2020-21 चे मूळ अंदाजपत्रक 1141 कोटी 96 लाखांचे असून, 168 कोटी 75 लाखांचे शिलकीचे अंदाजपत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. 2020-21 च्या अंदाजपत्रकात 128 कोटी 82 लाख आरंभीच्या शिलकीसह महापालिकेचे 582 कोटी 26 लाखांचे उत्पन्न, अनुदान 91 कोटी 82 लाख, असे एकूण 674 कोटी 8 लाख प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे 90 कोटी 61 लाखांचा महापालिका निधी व 377 कोटी 27 लाख शासकीय निधी मिळून 1141 कोटी 96 लाखांचे अंदाजपत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. 

नक्की पहा : धक्कादायक...आईची पाठ फिरताच बालिका दारातून बेपत्ता !
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news Jalgaon municipal budget is estimated at 1141 crore