जिल्हाधिकाऱ्यांचा दुसरा दणका... चार ग्रामपंचायतींचे सात सदस्य अपात्र 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

जळगाव : जातीचे प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने चार ग्रामपंचायतींच्या सात सदस्यांना अपात्र करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. 

जात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या पाच ग्रामपंचायतींच्या अकरा सदस्यांवर सोमवारी (ता. 10) जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केली होती. आज पुन्हा चार ग्रामपंचायतींच्या सात सदस्यांवर अपात्रतेची कारवाई केली आहे. यात चाळीसगाव, मुक्ताईनगर, जामनेर व एरंडोल या तालुक्‍यांतील चार ग्रामपंचायतींच्या सात सदस्यांचा समावेश आहे. 

हेही पहा -  भाजप- शिवसेना सदस्यांत खडाजंगी

जिल्हा विधी अधिकारी हरुल देवरे यांनी सांगितले, की मोरगाव (ता. जामनेर) ग्रामपंचायतीच्या सदस्या गिरिजाबाई महिराम राठोड यांनी 2018 मध्ये राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. मात्र, जातीचे प्रमाणपत्र सादर केले नव्हते. या प्रकरणी हिरालाल राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 11 जुलै 2019 ला तक्रार केली होती. त्यावर आज सुनावणी होऊन गिरिजाबाई राठोड यांना अपात्र घोषित केले आहे. शेमदडे (ता. मुक्ताईनगर) ग्रामपंचायतीच्या सदस्या संगीता पुंडलिक कोळी यांनी 2015 मध्ये महिला राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविली होती; परंतु जात प्रमाणपत्र सादर न केल्याबाबत 20 ऑगस्ट 2019 ला विनोद विठ्ठलराव चोपडे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवर आज सुनावणी घेऊन संगीता कोळी यांना अपात्र ठरविले. खेर्डे (ता. चाळीसगाव) ग्रामपंचायतीच्या सदस्या मीनाबाई लहू सोनवणे यांनी 2018 मध्ये निवडणूक लढविली होती. मात्र, जात प्रमाणपत्र सादर न केल्याबद्दल नंदकिशोर धनराज पाटील यांनी 23 मार्च 2019 ला जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. यावर आज सुनावणी झाली. मीनाबाई सोनवणे यांनी मात्र मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. 
 
विखरणचे चार सदस्य अपात्र 
विखरण (ता. एरंडोल) ग्रामपंचायतीचे सदस्य योगराज बळिराम महाजन, किरण हिरामण महाजन, बापू भिखा इंगळे व माधुरी मनोहर ठाकूर यांनी 2018 मध्ये निवडणूक लढविली होती. मात्र, निवडणुकीनंतर दिलेल्या मुदतीत अर्ज सादर न केल्याने ओंकार कृष्णा पाटील यांनी 27 ऑगस्ट 2019 ला तक्रार केली होती. या तक्रारीवर आज सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी या चारही सदस्यांना अपात्र घोषित केले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon collector four gram panchayat sevan member disqualify