गावाकडे निघाले... अन्‌ पतीच्या डोळ्यासमोर पत्नीचा मृत्यू ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

सुसाट ट्रकने कट मारला. त्यात दुचाकीस्वाराचा तोल गेल्याने मागे बसलेली विवाहीता ट्रकखाली चिरडली गेल्याची भिषण घटना आज घडली.

जळगाव : जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील कसुंबा (ता.जळगाव) येथे बसस्टॅण्डवर बहिण भाचीला सोडणाऱ्या दुचाकीस्वाराला सुसाट ट्रकने कट मारला. त्यात दुचाकीस्वाराचा तोल गेल्याने मागे बसलेली विवाहीता ट्रकखाली चिरडली गेल्याची भिषण घटना आज घडली. या अपघातात दुचाकीस्वारासह बाविसवर्षीय तरुणी व अडीचवर्षीय चिमुरडी जखमी झाले आहे. अपघात घडताच ग्रामस्थानी धाव घेत ट्रकचालकाला पकडले. एमआयडीसी पोलिसांनी जखमीच्या तक्रारीवरुन ट्रकचालकावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. 

मुंबईत भैय्या विजय पाटील हे रेल्वेत नोकरीला असून विरार येथे पत्नी रुपाली व अडीच वर्षीय मुलगी 
श्रेया या मुलीसह वास्तव्यास आहेत. ते, मुळ लासूर (ता.चोपडा) येथील रहिवासी असून काल रात्री साडेबारा वाजता ते, रेल्वेने जळगाव स्थानकावर उतरले. रात्री गावी जाणे अशक्‍य असल्याने कुसूंबा येथे मावशीच्या घरी मुक्काम त्यांनी केला. सकाळी गावाकडे जाण्यासाठी भैय्या पाटील कसुंबा बसस्टॅण्ड आले. 
मागून त्यांचा शालक निलेश दुचाकीवरुन मोठी बहीण रुपाली, लहान प्रतिक्षा आणि भाची श्रेयाला दुचाकीवर 
बसवुन गावाच्या बसस्टॅण्डवर आणत होता. त्याचे वाहन मुख्य रस्त्यावर येताच मागून सुसाट वेगात येणाऱ्या ट्रक (एमएच.19झेड.6465) या वाहनाने मागून दुचाकीला कट मारल्याने दुचाकीचा तोल जाऊन 
तिघेही रस्त्यावर कोसळले. रुपाली ट्रकच्या बाजुने पडल्याने चाकाखाली येवून जागीच मृत्यु मूखी पडली. तर बहीण प्रतिक्षा दिलीप पाटील (वय-22), भाची श्रेया(अडीच वर्षे) आणि चालक निलेश दिलीप पाटील (वय-28) जखमी झाले. अपघात घडताच बसस्ट्‌ण्ड जवळ उभे दिलीप पाटील यांच्यासह स्टॉपवरील रिक्षाचालकांनी मदतीला धाव घेतली. गावातील मजीद पठाण, जितू पाटील, मनिलाल वंजारी, भावराव महाजन यांनी जखमींना उचलून पिंटू राजपुत यांच्या आटोरिक्षातून जिल्हा रुग्णालयात 
दाखल केले. घटनेचे वृत्त कळताच पोलिस पाटील राधेशाम पाटील यांच्यासह एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रकचालकास ताब्यात घेतले असून उशिरा पर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते. 

नक्की पहा ः पोलिसांची आरोग्य तपासणी होतेय खासगी रुग्णालयात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news kusumba accidant one deth