जन्मदात्या आईचा केला छळ...अन्‌ झाली प्रवेश बंदी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

मानसिक छळ करणाऱ्या मुलाला त्याच्या घरात प्रवेशबंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय जळगावच्या प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांनी गुरूवारी दिला

जळगाव : घराचा ताबा मिळावा यासाठी जन्मदात्या आईचा मुलाने तिला मारहाण तसेच मानसिक छळ करणाऱ्या मुलाला त्याच्या घरात प्रवेशबंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय जळगावच्या प्रांताधिकारी दीपमाला 
चौरे यांनी गुरूवारी दिला. तसेच यासोबतच छळ करणाऱ्या मुलासह इतर दोन मुलांना आईला प्रत्येकी 2 हजार 500 रूपये निर्वाह भत्ता देण्याचेही आदेश दिले. 

सुमन आनंदा पाटील (वय 75, रा. गणेशवाडी, जळगाव) यांना दिलीप आनंदा पाटील, रमेश आनंदा पाटील, किशोर आनंदा पाटील आणि दोन मुली अशी अपत्ये आहेत. सुमन पाटील यांचे पती आनंदराव रामजी पाटील हे मजुरी काम करीत होते. तर सुमन पाटील ह्या शिवणकाम करून घराचा उदरनिर्वाह भागवित होते. मुलाबाळांना शिकवुन मोठे करण्याचे कर्तव्य पार पाडत असतांनाचा सन 2009 मध्ये आनंदराव पाटील यांचे निधन झाले. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी आई सुमन पाटील यांच्यावर आली. स्वकमाईतुन सुमन पाटील यांनी दोन मजली पक्के घर बांधले. सुमन पाटील यांचे दिलीप व रमेश पाटील ही दोन मुले लग्नानंतर विभक्त होऊन संसाराला लागले. त्यानंतर तिसरा मुलगा किशोर आनंदा पाटील हा आईमध्येच राहत होता. किशोर पाटील याने लग्न झाल्यानंतर घर नावावर करावे म्हणून आई सुमन यांचा मानसिक, शारिरीक छळ करण्याला सुरवात केली. मारहाण करून धमक्‍याही दिल्या. यासंदर्भात सुमन पाटील यांनी 1 डिसेंबर 2016 व 6 जानेवारी 2017 रोजी औद्योगिक वसाहत पोलीस निरीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला. तसेच ऍड. बिपीन पाटील यांच्यामार्फत नोटीसही देण्यात आली. मात्र ही नोटीस किशोर पाटील यांनी स्विकारली नाही. त्यानंतर न्यायालयातही सुमन पाटील यांनी दावा दाखल केला. तसेच उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे यांच्याकडेही सुमन पाटील यांनी तक्रार अर्ज केला होता. 
 

अबब...समोरील दृष्य पाहताच...वाहनधारकांच्या अंगावर आले शहारे !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news Mother's torture sun hoom Access ban