esakal | कोणी ऐकत नाही...तर राजीनामा द्या ः राष्ट्रवादीसेलतर्फे आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

ncp andolan

राष्ट्रवादीतर्फे आज काव्यरत्नावली चौकात आंदोलनातून मागणी केली. यावेळी आमदार केवळ बेलफुल वाहण्याच्या कामाचे बॅनर तसेच आमदार भोळेंच्या प्रतिमेला बेलफुल वाहून अनोखे आंदोलन यावेळी करण्यात आले

कोणी ऐकत नाही...तर राजीनामा द्या ः राष्ट्रवादीसेलतर्फे आंदोलन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः पाच वर्षात मुख्यमंत्री त्यांचा, पालकमंत्री त्यांचा, मंत्री त्यांच्या पक्षाचा, महापौर त्यांचा असतांना देखील शहरातील कामे का मार्गी लावणे आमदार सुरेश भोळेंना का जमले नाही. उलट अधिकाऱ्यांनी माझी राजीनाम्याची सुपारी घेतल्याचे वक्तव्य करून ते हतबल झाल्याचे दिसून येत असून त्यांना जमत नसेल तर त्यांनी राजिनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे आज काव्यरत्नावली चौकात आंदोलनातून मागणी केली. यावेळी आमदार केवळ बेलफुल वाहण्याच्या कामाचे बॅनर तसेच आमदार भोळेंच्या प्रतिमेला बेलफुल वाहून अनोखे आंदोलन यावेळी करण्यात आले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस अर्बन सेलतर्फे जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकात गुरूवारी आमदार सुरेश भोळे यांच्या विरोधात बेलफुल वाहण्याचे अनोखे आंदोलन दुपारी बारा वाजता करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी विविध घोषणा बाजी करून आमदारांच्या निष्क्रीय कामकाजाचे वाभाडे काढत पाच वर्षात सत्ता असतांना काय केले असे प्रश्‍न यावेळी आंदोलनातून व्यक्त केले. त्यांचा अयशस्वी पणा हा अधिकाऱ्यांवर काढत असून ते माझी राजीनाम्याची सुपारी घेतल्याचे त्यांचे वक्तव्यावरून त्यांची निष्क्रीयता 
दिसून असून त्यांच्यात थोडी ही नैतीक्ता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा जिल्हाध्यक्षा अश्‍विनी देशमूख यांनी प्रतिक्रिया तसेच पत्राद्वारे मत व्यक्त केले आहे. आंदोलनात महानगराध्यक्ष ममता सोनवणे, उपाध्यक्ष लता पाटील, सरचिटणीस मंगल पाटील, सचिन सामी गोसावी उपाध्यक्षा मनिषा देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

हे नक्की पहा :यंत्राच्या दुनीयेत रंगला अन्‌.... भंगार साहित्यातून बनवले फायटर विमान

आमदारांच्या प्रतिमेला वाहिले बेलफुल 
आमदार भोळेंच्या विरोधात काव्यरत्नावली चौकात जिल्हाध्यक्षा अश्‍विनी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाले. यावेळी आमदार बेलफुल वाहण्याच्या कामाचे असे बॅनर झळकविण्यात आले तर आमदारांच्या प्रतिमेला बेलफुल वाहून त्यांच्या निष्क्रीयतेचा निषेध कार्यर्त्यांनी यावेळी केला. 

loading image