समुद्राकाठचा "सॅंडरलीन' खडकीच्या पाणथळावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

 जळगाव : उत्तर अमेरिका, उत्तर युरोप, उत्तर आशिया येथील मूळ निवासी असलेला व प्रामुख्याने समुद्र किनारी आढळणाऱ्या "सॅंडरलीन' (Sanderlin) पक्ष्याच्या थव्याचे दर्शन नुकतेच एरंडोल येथील खडकी खुर्द परिसरातील पाणथळ जागी  हे पक्षी आढळून आले. या पक्ष्यांचे थवे हिवाळ्यात स्थलांतर करतात व जगभर पसरतात. यांचे हे स्थलांतर प्रामुख्याने वालुकामय व दलदलीच्या सागरकिनारी होत असते. मात्र, प्रथमच हा पक्षी आपला सागरी भाग सोडून यंदा हिवाळी पाहुणा म्हणून खानदेशातील अंतर्भागात आला असून तो येथे कसा आला, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

 जळगाव : उत्तर अमेरिका, उत्तर युरोप, उत्तर आशिया येथील मूळ निवासी असलेला व प्रामुख्याने समुद्र किनारी आढळणाऱ्या "सॅंडरलीन' (Sanderlin) पक्ष्याच्या थव्याचे दर्शन नुकतेच एरंडोल येथील खडकी खुर्द परिसरातील पाणथळ जागी  हे पक्षी आढळून आले. या पक्ष्यांचे थवे हिवाळ्यात स्थलांतर करतात व जगभर पसरतात. यांचे हे स्थलांतर प्रामुख्याने वालुकामय व दलदलीच्या सागरकिनारी होत असते. मात्र, प्रथमच हा पक्षी आपला सागरी भाग सोडून यंदा हिवाळी पाहुणा म्हणून खानदेशातील अंतर्भागात आला असून तो येथे कसा आला, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. गेल्या दहा वर्षांच्या पक्षी निरीक्षणात "सॅंडरलीन' पक्ष्याची केलेली ही नोंद खूप मोठी उपलब्धी असल्याचे शिल्पा व राजेंद्र गाडगीळ या दांपत्याने "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

कोण आहे "सॅंडरलीन'? 
"सॅंडरलीन' हा पक्षी मराठीत "पोची' या नावाने ओळखला जातो. छोटी चिखली या पाणथळ जातीचे पक्षी व त्यात बरेच साधर्म्य आहे. सॅंडरलीन पक्ष्याचा अंतर्भाग पांढरा आणि राखाडी पंखांना खांद्यापाशी छोटासा गडद पॅचमुळे हा वेगळा ओळखू येतो. पसरलेल्या पंखावरचा शेपटीला जाऊन मिळणारा पांढरा पट्टा उडताना ठळकपणे दिसून येतो. पाय आणि चोच काळी असते. हिवाळा संपत आला की साधारण मार्चअखेरीस "सॅंडरलीन' हे त्यांच्या मायदेशी परतता. 
टुंड्रा, अलास्का, सैबेरियन बेटे आणि उत्तर रशिया या अतिथंड प्रदेशात यांची वीण असते. एकावेळी ते दोन-तीन अंडी घालतात. हजारो मैलांचा प्रवास करून ते आपल्याकडे अन्नाच्या शोधात समुद्र किनारी येत असतात. समुद्र किनारा सोडून ते इतक्‍या खोल गोड पाणी असलेल्या या पाणथळ जागी कसे आले? भटकत रस्ता चुकून आले की एकूणच जागतिक तापमानात व हवामानात होणाऱ्या बदलाचा परिणाम असेल? असा प्रश्न पडल्याचे व त्याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचेही गाडगीळ यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news sandrlin khadki dam