Jalgaon News : जळगाव एमआयडीसीत भीषण आग; 'आर्यवर्त केमिकल' कंपनी खाक, कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली!

Massive Fire Engulfs Aryavart Chemicals in Jalgaon MIDC : जळगाव एमआयडीसीच्या एन-९७ सेक्टरमधील आर्यवर्त केमिकल प्रा. लि. कंपनीला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली असून, घटनेदरम्यान अग्निशमन दलाच्या ८ ते १० बंबांद्वारे आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
Fire

Fire

sakal 

Updated on

जळगाव: शहरातील एमआयडीसी परिसरातील एन-९७ सेक्टरमध्ये असलेल्या आर्यवर्त केमिकल प्रा. लि. कंपनीला शुक्रवारी (ता. १४) सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी खाक झाली. लाखो लिटर रासायनिक साठा असलेल्या या कंपनीत प्रचंड स्फोटक वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कर्मचारी वेळेवर बाहेर पळाल्याने जीवितहानी टळली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com