Crime
sakal
जळगाव: औद्योगिक वसाहत परिसरातील जनावरांच्या बाजाराजवळील लघुउद्योजक आणि व्यावसायिकांची सलग सहा-सात दुकाने फोडून चोरट्यांनी कहरच केला. या परिसरात रविवारी (ता.२३) मध्यरात्री अक्षरशः उच्छाद मांडून साडेसहा लाखांची रोकड लंपास केली असून, ज्यांच्या तिजोऱ्या उघडल्या नाहीत, अशा दोन लघुउद्योजकांच्या तिजोऱ्या या चोरट्यांनी लंपास केल्या असून, चोरटे ‘सीसीटीव्ही’त कैद झाले आहेत. या प्रकरणी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.