जळगाव: एकीकडे नवीन उद्योगांना भूखंड मिळत नाही, त्यांना औद्योगिक क्षेत्रात (एमआयडीसी) जागा नाही. त्यामुळे नवीन एमआयडीसी प्रस्तावित असताना, आहे त्या औद्योगिक क्षेत्रात याआधीच अनेक वर्षांपासून वितरित झालेले जळगाव जिल्ह्यातील पाचशेवर भूखंड (प्लॉट) विकासाविनाच पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.