Jalgaon MSEDCL
sakal
जळगाव: ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांच्या कृती समितीतील सात संघटनांनी व्यवस्थापनाच्या पत्रानुसार केलेल्या आवाहनाचा आदर राखत संप तात्पुरता स्थगित केला आहे. १४ व १५ ऑक्टोबरला निश्चित झालेल्या वाटाघाटीचे निर्णय घेण्यात येणार असल्याने ७२ तासांचा संप २४ तासांनंतर तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.