Jalgaon News : जळगावकरांना नवी भेट! एसटीच्या ताफ्यात दाखल होणार ५५ आसनी 'राजमाता जिजाऊ' बस
MSRTC Introduces Rajmata Jijau Bus with 55 Seating Capacity : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणारी ५५ आसनी अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बस प्रवाशांच्या वाढत्या गर्दीला दिलासा देणार आहे.
जळगाव: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस बांधणीत प्रयोग करत आपल्या ताफ्यात नवीन बस आणत आहे. याचा फायदा महामंडळाला होऊ लागला आहे. साधारण २५ वर्षांपूर्वी एसटीच्या ताफ्यात असलेली ५५ आसनी बस आता नव्या रूपात दाखल होत आहे.