Municipal Election
sakal
जळगाव: महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सोमवारी लागू झाल्यानंतर मंगळवारी (ता. १६) सायंकाळी चारला महापालिका निवडणुकीसाठी शासन नियुक्त केलेले अधिकारी, पोलिस अधिकारी व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीत उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज कसा भरावा, प्रतिज्ञापत्र, लागणारी आवश्यक कागदपत्रे, पक्षाचे एबी फॉर्म, कधी दाखल करावा, सुचक, अनुमोदक किती लागणार, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच एका उमेदवाराला ९ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा, खर्चाचे दरपत्र आदींबाबत माहिती सांगण्यात आली.