Jalgaon municipal corporation
sakal
जळगाव: महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज घेण्याचा अंतिम दिवस शुक्रवारी (ता. ३०) गाजला. भाजपकडून प्रत्येकी सहा असे एकूण १२ अर्ज घेतले, तर शिवसेनेकडून महापौर पदासाठी दोन आणि उपमहापौरपदासाठी दोन असे एकूण चार अर्ज घेण्यात आले आहेत. महायुतीमधील दोन्ही पक्षांनी महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज घेतल्याने या पदांसाठी कोणाची वर्णी लागणार, याचा ‘सस्पेन्स’ कायम असल्याचे दिसून येत आहे. आता २ फेब्रुवारीला कोण उमेदवारी अर्ज दाखल करतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असणार आहे.