Jalgaon Municipal Corporation : जळगाव पालिकेच्या तिजोरीची चावी कुणाकडे? स्थायी समिती सभापतिपदासाठी जोरदार फिल्डिंग!

Focus Shifts to Standing Committee After Mayor Election in Jalgaon : जळगाव महापालिकेतील महापौर व उपमहापौर निवडीनंतर आता स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Municipal Corporation

Municipal Corporation

sakal 

Updated on

जळगाव: महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची निवड पूर्ण झाल्यानंतर आता महापालिकेतील सर्वांत महत्त्वाच्या स्थायी समितीवर लक्ष केंद्रित झाले आहे. महापालिकेच्या आर्थिक तिजोरीची चावी मानल्या जाणाऱ्या या समितीच्या सभापतिपदासाठी तसेच सदस्यपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महायुतीतील गटनेत्यांकडून नगरसचिव विभागाकडे बंद पाकिटात सदस्यांची नावे लवकरच सादर केली जाणार असून, त्यातून सभापती व सदस्यांची निवड होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com