Jalgaon Municipal Election
sakal
जळगाव: महापालिकेत महायुतीच्या उमेदवारांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी, अशा दोन प्रमुख गटांमध्ये लढत होत आहे. अन्य आघाड्या व अपक्षही मैदानात आहेत. १२ उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर आता शहरातील १९ प्रभागांमधील ६३ जागांसाठी लढत होत असून, सहा ठिकाणी थेट, दहा जागांवर तिरंगी तर ११ जागांवर चौरंगी सामना रंगणार आहे.