Girish Mahajan and Gulabrao Patil
sakal
जळगाव: ‘शक्यतो युती कराच...’ असा निरोप प्रदेश नेतृत्वाकडून आल्यामुळे जळगाव महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवत भाजपने शिवसेनेशी युती करण्याचे जवळपास निश्चित केले आहे. जागावाटपासाठीची चर्चा अद्याप व्हायची असली तरी ७५ जागांमध्ये भाजप-शिवसेनेत ६०:१५ या फॉर्म्युलावर सहमती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.