Jalgaon Police
sakal
जळगाव: महापालिका निवडणूक रणधुमाळीला आजपासून (ता. २३) खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून यंत्रणा कामाला लागली आहे. त्याचप्रमाणे, पोलिसदलानेही आपल्या बाजूने तयारी केली असून, निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या सुचनेनुसार ‘मायक्रोप्लॅनिंग’ करण्यात आले आहे.