Girish Mahajan
sakal
जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपालिका व दोन नगरपंचायतींच्या निवडणुकांचे काही ठिकाणी अपेक्षित अन् काही ठिकाणी अनपेक्षित व धक्कादायक निकाल समोर आले. सर्वाधिक नऊ ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले असले, तरी मंत्री संजय सावकारे यांना भुसावळात त्यांच्या पत्नीला, पालकमंत्री गुलाबराव पाटलांना त्यांच्याच गृह मैदानावरील धरणगावात तर केंद्रात राज्यमंत्री असलेल्या रक्षा खडसे यांना मुक्ताईनगरातून त्यांच्या उमेदवाराला निवडून आणता आले नाही, हा मोठा धक्का मानला जातोय.