Elections
sakal
जळगाव: जिल्ह्यात तब्बल चार ते पाच वर्षांच्या कालाखंडांनंतर जिल्ह्यातील १६ नगरपालिका व २ नगरपंचायतींच्या निवडणूका येत्या दोन डिसेंबरला होणार आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने जे इच्छूक आहेत, ते दावेदारी करीत आहेत. सर्वच राजकीय पक्षात नगराध्यक्षपदासाठी दावेदार अनेक असले तरी नेमके राजकीय पक्ष व वरिष्ठ नेत्यांच्या निकषात बसतात कोण, हे महत्त्वाचे आहे.