Municipal Election
sakal
जळगाव: महापालिकेचे मंगळवारी (ता. ११) आरक्षण जाहीर झाल्यावर शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. आगामी नगरसेवक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक आणि नव्याने पक्षात इनकमिंग झालेले कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विविध पक्षांतर्गत गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, प्रभागनिहाय बॅनरबाजी, सोशल मीडिया मोहिमा आणि सामाजिक कार्यक्रमांमधून जनसंपर्क वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याने इच्छुक उमेदवारांची उमेदवारी मिळविण्याची स्पर्धा आता शहरात दिसू लागली आहे.