flight service
sakal
जळगाव: नाशिक येथे यंदा होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी जळगाव-नाशिक विमानसेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. जळगाव व नाशिक येथील दोन्ही विमानतळ कार्यरत असल्यामुळे ही सेवा तांत्रिकदृष्ट्या शक्य असून, सध्या प्राथमिक स्तरावर यासंदर्भात हालचाली सुरू आहेत.