Electricity Safety Measures for Navratri Celebrations in Jalgaon : महावितरणने मंडळांसाठी घरगुती दरात तात्पुरती वीजजोडणी उपलब्ध करून दिली असून, रोषणाई, देखावे, मंडप, महाप्रसाद व इतर कार्यक्रमांसाठी आवश्यक वीज व्यवस्था केवळ अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करावी, असा निर्देश देण्यात आला आहे.
जळगाव: नवरात्रोत्सवाला सोमवार (ता. २२)पासून प्रारंभ होत असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच उत्सव साजरा करावा, असे आवाहन जळगाव ‘महावितरण’ने केले आहे.