भुसावळात खून का बदला खून...! 

भुसावळात खून का बदला खून...! 

भुसावळात खून का बदला खून...! 

भुसावळ : राजकारण असो अथवा भाईगिरी या सर्वांचा काळ व वेळ ठरलेली असते. दीड वर्षांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्दयी हत्या केल्याचा आरोप मृत सागर खरात याच्यावर होता. ज्या तरुणाच्या वडिलांचा खून झाला, त्याने शहर पोलिस ठाण्यात त्यावेळी खून का बदला खून ही होंगा, अस उघड बोलून दाखवत ‘खरात फॅमिली मरवा दुंगा’ अशी धमकीच दिली होती, त्याचा प्रत्यय कालच्या घटनेवरून आला. 

नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांचेवर अवैध दारू विक्रीपासून ते खुनापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या तीन वर्षापूर्वी भाजपच्या तिकिटावर नगरपरिषदेवर निवडून गेले, बांधकाम सभापती झाले. तेव्हापासून ते कुठल्याही वादात पडत नव्हते. मात्र त्यांचा मुलगा सागर हा तापट स्वभावाचा होता. दीड वर्षांपूर्वी सलीम शेख शेरु या रेल्वे कर्मचाऱ्याचा खून झाला व खरात परिवारावर विपदा आली. मध्यंतरी त्यांच्या समतानगर येथील तीन मजली इमारतीवर गोळीबार झाल्याचे प्रकरण गाजल होतं. ज्या इसमाचा खून झाला, त्याचा मुलगा शेख हाशिम शेख शेरु (रा. खडका चौफुली, मुस्लिम कॉलनी) याने मनात खूणगाठ बांधलेली होतीच. त्याने मग खरात विरोधी तरुण एकत्र केले. त्यात डॉ. आंबेडकर जयंतीचा वाद असेल, दोघा तिघांना घरात बांधून पट्ट्याने मारणे असेल, किंवा कुणा शेठला ब्लॅकमेल केल असेल. तसेच माउली केटरर्स चा मुलगा असेल, की ज्याला वारंवार बिअरसाठी तगादा लावून त्रास दिला जात असेल. असे हे चारही दुखीआत्मे एकत्र आले व त्यांनी खरातचा काटा काढण्याचे मनसुबे रचले. 

तीन दिवस केली रेकी 
काल राजा ऊर्फ मोहसीन असगर खान, मयूरेश सुरवाडे, शेखर हिरालाल मोघे यांनी मद्य प्राशन केले. खरात यांच्या घराबाहेर तीन दिवस आधी रेकी केली. नवरात्रीची उत्सवात दांडिया-गरबा सुरू असल्याने आवाजाच्या गोंगाटात हल्लेखोरांनी कुणाला काही समजण्याच्या आत रवींद्र खरातवर गोळीबार केला. पळून एका खोलीत गेल्यावर खिडकीतून गोळीबार केला. खाली कोसळल्याने त्यांच्यावर चाकूने वार केले. भाऊ सुनील खरात मध्ये आल्याने मारेकऱ्यांनी त्याच्यावर गोळी घातली. पत्नी रजनी यांना चाकू मारून दहशतीत घेतले. कुणाला काही कळायच्या आत सुरू असलेल्या मोटरसायकलवर बसून थोड पुढे आल्यावर सागर, रोहित व त्यांचा मित्र सुनील गजरे यांच्याशी झटापट केली. ऐकत नाही, असे लक्षात येता, गोळीबार व चाकूने भोसकून मारले. तेथून सरळ नशिराबाद मार्गे जळगाव गाठले. स्थानिक गुन्हे शाखेत स्वतःहून जमा झाले. 

पोलिस अधिकारी तळ ठोकून 
जखमींना डॉ. राजेश मानवतकर यांच्याकडे आणले. इतरांना गोदावरी रुग्णालयात व तेथून जळगावला सामान्‍य रुग्णालयात हलविले. पंचवीस मिनिटे हा थरार चालला. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढविला. सर्व आरोपी अटकेत असून यांना कुणी गॉडफादर आहे का? या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. नाहक कुणाचेही राजकीय संबंध नसताना नाव गोवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे सूचक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रीच दिले. वरिष्ठ अधिकारी भुसावळ शहरात तळ ठोकून आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com