दुधपेत्या तान्हुलीला घेवुन पिता पसार : मग काय घडले वाचा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मे 2020

अवघ्या सहा महिन्याचं बाळ, चार दिवसांपासून दुर असल्याने आईची घालमेल वाढली होती..बाळाच्या आठवणीने जेवणही जाईना..अखेर खाकीच्या प्रयत्नाने पाचव्या दिवशी तान्हुली कियारा दिसताच आईने तिला घट्ट कुशीत घेत..लाड केले. हे दृष्य पाहून आईच्या प्रेमाने वातावरण भावनीक झाले होते.

जळगाव;- शहरात रामेश्‍वर कॉलनीतील दाम्पत्यात कौटूंबीक कारणावरुन कडाक्‍याचे भांडण होवुन संतप्त नवरोबाने पत्नीला सोडून 6 महिन्याची तान्हुली घेवुन घरसोडून निघुन गेला होता.अंगावर दुध पेणाऱ्या बाळापासून चार दिवस लांब राहून अश्रुढाळत आई एमआयडीसी पोलिसांत धडकली. उपनिरीक्षक संदिप पाटिल यांनी सखोल माहिती घेत सावदबारा (ता.फर्दापुर-औरंगाबाद) येथे निघुन गेलेल्या पतीची समजुत घालत वेळ प्रसंगी कायद्याचा धाक दाखवत वठणीवर आणले. पती-पत्नीत समझोता झाल्यावर पाचव्या दिवशी तान्हुली आईच्या कुशीत परत आली. 

मेहरुण रामेश्‍वर कॉलनीत आनंद राठोड, पत्नी सायली सहा महिन्याची मुलगी "कियारा' यांच्यासह वास्तव्यास आहे, गेल्या आठवड्यात पती-पत्नीत वाद होवुन कडाक्‍याचे भांडण झाले. भांडण विकोपाला जावून आनंद राठोड याने कियारा(वय-6)या बाळाला घेत पत्नीला घरीच सोडून निघुन गेले. पत्नीने वाट बघीतली मात्र, पती काही परत येत नाही, एक दोन आणि चक्क चार दिवस उलटून अंगावर दुधपेणारे बाळ आई पासून वेगळे झाल्याने मातृहदयी वेदनांचे काहुर माजले होते. काय करावे या विवंचनेत असतांना आई सायलीने थेट एमआयडीसी पिोलस ठाणे गाठत घडला प्रकार सांगीतला. उपनिरीक्षक संदिप पाटिल यांनी संपुर्ण घटना ऐकून घेत या महिलेला धीर देत निरीक्षक विनायक लोकरे, सहाय्यक अधीक्षक डॉ.निलाभ रोहन, अप्पर अधिक्षक भाग्यश्री नवटके यांना प्रसंग कळवला. वरीष्ठांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संदिप पाटिल यांनी फर्दापुर तालूक्‍यातील चारुतांडा येथे आनंद रोठोड यांच्या मुळगावी संपर्क केला. कुसूंबा येथील डॉ. विकास पाटिल यांच्या सहकार्याने पती-पत्नीतील वाद मिटवण्याचे प्रयत्न यशस्वी होवून आनंद राठोड मुलीसह घरी परतले. दोघा पती-पत्नीची भेट झाल्यावर त्यांना समज देत समेट घडवून आणला. 

तान्हीली कियारा आईच्या कुशीत 
अवघ्या सहा महिन्याचं बाळ, चार दिवसांपासून दुर असल्याने आईची घालमेल वाढली होती..बाळाच्या आठवणीने जेवणही जाईना..अखेर खाकीच्या प्रयत्नाने पाचव्या दिवशी तान्हुली कियारा दिसताच आईने तिला घट्ट कुशीत घेत..लाड केले. हे दृष्य पाहून आईच्या प्रेमाने वातावरण भावनीक झाले होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news ; dispute in marid couple