Oxygen Plants
sakal
देवीदास वाणी, जळगाव: कोरोनाच्या २०२०-२०२२ या तीन वर्षांच्या काळात जिल्ह्यात ऑक्सिजन जनरेशन प्लांट २४, तर लिक्विड ऑक्सिजन प्लांट १५ अशा एकूण ५९ प्लांटमधून १४० टन ऑक्सिजन निर्मिती झाली होती. ज्यामुळे अनेक कोरोनाबाधित अनेकांचे जीव वाचले होते. मात्र, तिसरी लाट सरताच आरोग्य यंत्रणेने ऑक्सिजन प्लांटकडे दुर्लक्ष केले. कोट्यवधी रूपये खचून तयार करण्यात आलेले ऑक्सिजन जनरेशन प्लांट, लिक्वीड ऑक्सिजन प्लांट धूळखात पडून आहेत. केंद्र व राज्य शासनाचा कोट्यवधींचा निधी पाण्यात गेल्याच चित्र जिल्ह्यात आहे.